महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पर्यावरण लोकप्रिय बातम्या

भंडारा वनपरिक्षेत्रातील जंगलात बिबट्या आढळला मृतावस्थेत

नेशन न्यूज मराठी टीम.

भंडारा/प्रतिनिधी – भंडारा वनपरिक्षेत्रातील वाघबोडी तलावाजवळ जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असून वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत मालिपार बीटामधील वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात कक्ष क्रमांक २१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वरिष्ठांनी सूचना दिल्यावर भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक चौकशी केली असता बिबट्याच्या मानेवर दोन सुळ्यांचे निशाण दिसून आले. यावरून दोघांच्या झुंजीत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा सतत वावर वाढला आहे. अनेकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ दिसला आहे. या परिसरात बिबट्यांचाही वावर आहे. यातूनच बिबट्याची येथील निवासी वाघाशी झुंज होऊन त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×