नेशन न्यूज मराठी टिम.
सांगली/प्रतिनिधी – चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य रोडवरील देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीन वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या निर्दशनास आले.बिबट्या मेल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखीपसरताच चिकुर्डे देवर्डे ऐतवडे खुर्द व कुरळप परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.मागील आठ दिवसापासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत खडी परीसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण होते. वन विभागाला याबाबत वारंवार सूचना देऊन हि संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. ऐतवडे खुर्द सह करजंवडे देवर्डे कुरळप आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मंदिराच्या आसपास बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.
बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतात काम करत असताना अचानक समोरून आलेल्या बिबट्या ने त्यांची धादंल उडाली. या परिसरात असणाऱ्या शेत वस्ती वरील कुत्र्यांना बिबट्याने आपले भक्ष केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुत्र्यांचा, रेडकांचा फडशा पडला आहे. रात्री अपरात्री शेत वस्तीकडे जाताना शेतकऱ्यांना बिबट्या सातत्याने दिसत आहे. त्यामुळे काल ऐतवडे खुर्द ग्रामसभेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.