नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण “ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद” असे म्हणतात.
आज संपूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे. महाराष्ट्रात ईदचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. आज सकाळी सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी नांदेड येथील ईदगाह मैदानावर शहरातील हजारो मुस्लिम बांधव जमले होते नमाज पठण झाल्यानंतर सर्वानी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस बांधवाकडूनही मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी ईदगहा मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईदच्या या दिवशी खाद्यपदार्थोंची मेजवानी असते. शेवया, दूध, आणि सुक्यामेव्या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते. ईदच्या या दिवशी हिंदू-मुस्लिम यांच्यात एकोपा पाहायला मिळतो. कारण मुस्लिम बांधव हे आपल्या नातेवाईक, मित्र, शेजारी सर्वांना शीर खुरमा चे वाटप करतात. तसेच बरेचसे लोक या दिवशी हज यात्रेला जाण्याचे सुद्धा नियोजन करतात. हज यात्रा ही प्रत्येक मुस्लिमासाठी खूप आस्थेचा विषय आहे.