Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी ठाणे

कल्याण रेल्वे यार्डातील केबलच्या गोदामाला भीषण आग,आगीत लाखोंचे केबल जळून खाक

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण रेल्वे जंक्शनच्या पूर्व भागात असलेल्या रेल्वे यार्डमधील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात केबल वायर साठवून ठेवलेल्या असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल होऊन आगीवर दोन ते अडीच तासाने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र तोपर्यत गोदामातील लाखोंची केबल वायर जळून खाक झाली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील ७ नंबर फलाटाच्या बाजूला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता कार्यलय आहे. या कार्यालयाच्या लगतच रेल्वेच्या सिंगलसाठी लागणारी काळी जाड केबल वायर एका गोदामात साठवून ठेवली होती. त्यातच अचानक या केबलच्या गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच स्थानिक रेल्वेच्या अधिकाऱ्याने कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन आगीवर दोन ते अडीज तासात नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. सद्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.

      आगीची माहिती रेल्वे स्थानकात पसरताच एकच गोधंळ उडाला होता. त्यामुळे रेल्वे रेल्वे पोलिसांसह स्थानिक कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र  या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत असून ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X