Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image बिझनेस लोकप्रिय बातम्या

येवल्यात भरला ३५० वर्षाची परंपरा असलेला घोड्यांचा बाजार

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/प्रतिनिधी – गेल्या 350 वर्षांपासून नवरात्रीच्या काळामध्ये दसऱ्याच्या पहिल्या मंगळवार येतो तेव्हा येवला बाजार समितीच्या आवारात घोड्यांचा सर्वात मोठा बाजार भरत असतो.येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहारात भरवण्यास सुरुवात केली होती.

नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या पहिल्या मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असतो. तर या घोडेबाजारात राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे, शोकिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल होतात. चेन्नई, कर्नाटक, पंजाब, काठेवाडी, गुजराथ, पंजाब अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले आहेत. हा सर्वात मोठा नवरात्र उत्सवाच्या काळात भरणार घोड्याचा बाजार आहे. यावेळी रघुजी बाबाचे वंशज शाहूराजे शिंदे तसेच घोडे शौकिनांनी घोडेबाजार बाबत अधिक माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X