डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे .यामध्ये आरोपिमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकार्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे .प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला .या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची सध्या समोर आली आहे .या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे
डोंबिवली ग्रामीण परिसरात एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे .डोंबीवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली .पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली .या चौकशी मध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले .जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराणे बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला .हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला .या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले .बदलापूर,रबाळे ,मुरबाड आणि डोंबिवलीत ,वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला .मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामधील दोन अल्पवयीन आहेत .21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत .