नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्यात दंगली करून सामाजिक वातावरण बिघडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्त करत आहेत . त्आयांना आवर घालण्रोयासाठी तसेच सर्व समाजात एकोपा राहावा.सर्वत्र शांतता राहावी.यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता. कायदा व्यवस्था बिघडल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या आणि दंगलीचे मुख्य सूत्र धार शोधून गुन्हे दाखल करा अशा मागण्या यावेळी मोर्च्यात करण्यात आल्या. सकल भारतीय समाजातील मनात शासनाविरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याणमध्ये सकल भारतीय समाजाच्या वतीने मंगळवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व समाजातील जनता हजारोच्या संख्येने सहभागी झाली होती.यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्या, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करणार्याना शोधा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.असा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा मार्गे प्रांत कार्यालयात जाऊन धडकला. यावेळी, शिष्ट मंडळाने प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व समाजातील अनेक संघटना एक भारतीय नागरिक म्हणून या मोर्चा सहभागी होते.