महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स महत्वाच्या बातम्या

मिरचीपुड डोळ्यात टाकुन लाखोंची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

 नांदेड/प्रतिनिधी – चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे चोरांचं धाडस वाढलं असून ते सर्रास चोरी करताना आढळून येतात. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. जिल्ह्यातील बोधडी येथील सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अनेक महिन्यांपासून गहाळ असलेल्या टोळीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

28 जानेवारीच्या संध्याकाळी सराफ व्यावसायीक नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करुन सोने,चांदीचे दागिने व नगदी पैसे असलेली बॅग घेऊन घरी जात होता. त्याचवेळी बोधडी गावातीलच रेल्वे अंडर ब्रिज येथे एका टोळीने या सराफ व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली त्यामुळे व्यावसायीक चोरांना रोखू शकला नाही. या टोळीने व्यावसायिकाच्या जवळील सोने,चांदीचे दागिने असा एकूण 7,58,655 रूपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता.

या घटनेनंतर व्यवसायिकाने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर गोपनीय माहितगार नेमून माहिती मिळवली असता संशयीत किशोर उर्फ बारक्या सोंळके याला आज रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या मते व्यावसायीक आणि आरोपींमध्ये दुकानावरुन वाद झाल्यामुळे त्या वादातून चोरी झाली असल्याची माहिती मिळाली. या घटनेत पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.

Translate »
×