महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स महाराष्ट्र

कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्याला गंडा, टोळी १२ तासात जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/प्रतिनिधी – मुंबईतील एका व्यापाऱ्याला स्वस्तातील कॉपर वायरचे (Copper wire) आमिष दाखवून लाखो रुपयांची लुट करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १३ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्यासोबतच पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत. लवकरच फरार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेली शंभर टक्के रक्कम रिकव्हर करू असा विश्वास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला आहे.

धुळे (Dhule) जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील जामद्या गावातले ठग हे स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून लुटमार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्म्या किमतीत देवू असे आमिष दाखविले.

त्यानुसार ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे ठरले. त्यासाठी या ठगांनी २२ से २३ लाखांच्या आगाऊ रकमेची मागणी केली. त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक हरिष पवार हे एक फॉरेनर महिला सहकारी सोबत पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनी जवळ आले. सुझलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते. त्यांनी मारहाण करून हरिष पवार यांच्या ताब्यातून तब्बल २२ लाख ३ हजारांची रोकड आणि २ लाख ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण २४ लाख ८८ हजार रुपयांचा माल लुटून नेले. यानंतर हरिष पवार यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या १२ तासांच्या आतच यामधील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध घेत असल्याची मागणी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Translate »
×