Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला कल्याणात बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/Dum3ki5mzMU?si=BkaX9L83kX0LrOAI

कल्याण/प्रतिनिधी – मध्य प्रदेश मधून सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या सहा जणाना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. 6 मे रोजी रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरुन एका बाळाचे अपहरण झाले होते. फेरीविक्रेते असणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फूटपाथवर झोपले असताना.. त्याचवेळी दोन बाईक स्वार या दाप्म्पत्याजवळ आले. त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबदरस्तीने उलचून नेत पळ काढला. त्यांच्या बाळाचे अपहरण झाले होते. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीव्हील लाईन पोलिस ठाण्यात केली होती.

तेथील पोलिसांनी त्वरीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते. अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दांम्पत्याचे नाव सांगितले. सोनी दांम्पत्य कल्याणला राहतात अशी महिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली. व आपल्या तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले. प्रदीपने सांगितले की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी आर्वी येरुणकरला देण्यात आले आहे. पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की, सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली आहे. तसेच बाळ सुखरुप आहे अशी माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली

Translate »
X