महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
थोडक्यात पोलिस टाइम्स

शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन चोरी करणारी टोळी गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पोलीस ठाणे पारध हद्दीत तसेच परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी पिका अभावी आपल्या शेतातील ठिबक सिंचन गोळा करुन एकत्रित जमा करुन ठेवलेली असता काही लोकांनी रात्रीच्या वेळेस या ठिंबक सिंचनाच्या पाईप्सची चोरी केली होती. याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी पारध पोलिस ठाण्यात येथे तक्रार केली होती.

त्यावरुन 15 मार्चला देखील अजून एक ठिबक चोरीची तक्रार पारध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात तपास सुरु केल्यानंतर पोलिसांना एका ठिकाणी ठिबक चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुसार एक गाडी ठिबक घेवून जाणार आहे अशी माहीती प्राप्त् झालेली होती, त्यावरुन सपोनि चैनसिंग गुसिंगे यांनी सदर आरोपी यांना पकडण्यासाठी वेगवेगळे पथक नेमले होते. दिनांक 23 मार्चला पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका पिकअप बोलेरो मध्ये चोरीचे ठिबक वडोदतांगडा कडून धावडा कडे जाणा-या रोडने जात आहे अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस अंमलदार भगत राजपुत, शिवाजी भगत, होमगार्ड पोपळघट यांनी पोखरी गावाजवळ सदर वाहणाला हात दाखवुन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यांनी वाहन न थांबता सुसाट वेगाने पळवले, त्यांनतर पोलीसांनी सदर वाहनांचा पाठलाग करुन धावडा गावाजवळ सदर पिकअप बोलेरो वाहन पकडण्यात आले आहे.

सदर बोलेरो पिकअप मध्ये पुर्ण ठिबक सिंचन पाईप्स भरलेली होती. तसेच सदर पिकअप मध्ये तीन ईसम देखील होते. या आरोपींना पोलिसंकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सदर आरोपी यांना पिकअप मधील ठिबक बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि सदर ठिबक हे विझोरा तालुका भोकरदन आणि जनुना तालुका बुलढाणा येथुन चोरुन आणले आहे तसेच सदर आरोपी यांनी दिनांक 15 मार्चला वालसांवगी शिवारातील ठिबक सुध्दा चोरुन नेल्याचे सांगितले तसेच सदर चोरुन नेलेले ठिबक जळगाव येथे विक्री केल्याचे सांगितले आहे. सदर आरोपी यांच्याकडुन पोलीस ठाणे पारध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून 2,36,000 रुपयाचे ठिबकासह एकूण 10,36,000 मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×