महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
कृषी चर्चेची बातमी

केळीची बिस्किटे बनविण्याचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – हल्ली शेती करणे फार अवघड झाले आहे, त्यामुळे अनेकजण जुन्या पद्धतीच्या शेतीला बगल देत नवी सांगड घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती फुलवली जात आहे. जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने केळीवर प्रयोग करत आज केळीपासून तब्बल सहा उत्पादने तयार केली आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनवण्याचा प्रयोग केला असून या उत्पादनाला पेटंट सुद्धा मिळाले आहे. एकूणच या शेती उत्पादनातूनच नवा मार्ग शोधत इतरांसाठी पर्याय उभा केला आहे. जळगाव जिल्हा कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. केळी लागवड मोठ्या संख्येने होत असल्याने अनेकदा कवडीमोल भावातच केळी विक्री करावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. जळगाव जिल्ह्यातीलच यावल तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक गडे यांनी मात्र हार न मानता यावर उपाय केला. आणि आज हीच केळी वेगवगेळ्या स्वरूपात महाराष्ट्रभर विक्री केली जात आहे. टॉफी, चिप्स, लाडू आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात केळी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. याचं सर्व श्रेय अशोक गडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जातं. गडे यांनी ही उत्पादने केळीपासून तयार करण्याचा उद्योग सुरु करत इतरांच्या हाताला देखील काम दिले आहे.

शेवटी अशोक गडे यांनी केळीच्या फळांवर प्रक्रिया करून उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवण्याची कल्पना मांडली. केळीच्या चिप्स, जाम, कँडीज, पापड, चिवडा आणि लाडू यांसारखे केळीचे पदार्थ बनवतात. तर आता यात बिस्किटांची देखील भर पडली आहे. आणि यावर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या केळीच्या बिस्किटांचे पेटंट दिले आहे. त्यामुळे एकप्रकारे केळीपासून नाविन्यपूर्ण स्वरूपात बिस्किटे बनविण्याचा निर्णय आज अशोक गडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसह फायदेशीर ठरला आहे. विशेष म्हणजे 2010 पासून त्यांनी केळीवर प्रक्रिया करून इतर पदार्थ बनविण्यास सुरवात केली. मात्र त्यांना बिस्किटाचा प्रयोग सफल होण्यास नऊ वर्षांचा कालावधी लागला. परंतु आता प्रयोग सफल झाल्यानंतर अशोक यांना भरघोस नफा मिळत असून केळीचा पुरवठा करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना देखील यातून नफा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×