नेशन न्यूज मराठी टिम.
सातारा/प्रतिनिधी – खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून घेतली सरकार दरबारी कोणी दखल घेतली नाही सर्व सरकारी यंत्रणांचे उबरठे झिजवून देखील कारवाई होत नसल्याने 15 ऑगस्टला शेतकऱ्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
खराडेवाडी येथील शेतकरी सुरेंद्र पांडुरंग जगताप यांची एकूण दहा एकर क्षेत्रातील शेत जमीन खाजगी सावकार व त्यांचे साथीदार यांनी जबरदस्तीने दहा एकर जमीन बळकवली आहे असे शेतकार्याचे म्हणणे आहे. वारंवार 2016 पासून महसूल आणि ग्रह खात्याला लेखी निवेदन देऊन सुद्धा न्याय न मिळाल्याने 15 ऑगस्ट रोजी सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.