नेशन न्यूज मराठी टीम.
भंडारा / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षण मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील ह्यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे यासठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान सरकारच्या भूमिकेबाबत म्हटले कि, खोटारडी व्यवस्था राज्यातल्या सत्तेत आली आहे.
ज्या देवेंद्र फडणवीसांनी 2014 मराठा,धनगर.हलबी समाजाला आरक्षणाची भुमिका मांडली होती मग जरांगे पाटलांचा उपोषण सोडायला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांसोबत न जाता राजस्थानला कशासाठी गेले ? फक्त मुद्दा बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी जाणिवपूर्वक केले असून विधानसभा अध्यक्षांनी अपात्रेतेची नोटीस शिवसेनेच्या आमदारांना बजावली आहे.त्यामुळे सेनेच्या आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन जरांगे पाटलांना दिले. जर शिंदेचे आमदार अपात्र ठरले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील.त्यावेळी ते म्हणतील की, एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं होत. मी दिल नाही हे सांगण्यासाठी फडणवीस मोकळे राहतील.
भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ते धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर बोलत होते. देवेंद्र फडणीसांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाची लावलेली ही आग आहे. त्यामुळे भाजपालाच ही आग विझवावी लागेल. या प्रश्नांना त्यांनाच न्याय द्यावा लागेल आणि योगायोगाने केंद्र सरकारच पाच दिवसाच अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये ही प्रक्रिया आहे. तेव्हा राज्य सरकारने एक ठराव घेवून केंद्राकडे पाठवावा आणि ते करवून घ्याव असा सल्ला नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिलाय.