नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – अनेक शतके जुनी भारताची समृद्ध सागरी परंपरा शिलाई जहाज बांधणीच्या पुनरुज्जीवनाने पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात भारतीय नौदल, सांस्कृतिक मंत्रालय आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स, गोवा, एका प्राचीन शिलाई जहाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी एकत्र आले आहेत, जे भारताच्या प्राचीन सागरी व्यापार मार्गांवर एकेकाळी महासागरात वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या जहाजांची आठवण करून देतात.
भारताच्या सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेला हा उल्लेखनीय प्रयत्न आपल्या देशाच्या समृद्ध जहाजबांधणी वारशाचे प्रतीक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना साकारण्यासाठी विस्तृत संशोधन आणि विषयतज्ञांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरला आहे.
हा उपक्रम विविध मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांनी आखण्यात आला आहे. आयोजक मंत्रालये या भारतीय नौदल जहाजाची रचना आणि बांधकामावर यावर देखरेख ठेवत आहेत. हे जहाज प्राचीन सागरी व्यापार मार्गांवरून प्रवास करणार आहे. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने संपूर्ण अर्थसहाय्य केले आहे, तर जहाजबांधणी मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवासाची निर्बाध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात या प्रकल्पाला मदत करतील.
प्राचीन जहाजबांधणी परंपरेच्या स्मरणार्थ प्रकल्प म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने 14 डिसेंबर 2022 रोजी या प्रकल्पाला मान्यता दिली. या जहाजाच्या बांधकामातील शिलाईचे काम शिलाई जहाज बांधणीतले तज्ञ बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील पथक करेल. या प्राचीन तंत्राचा वापर करून, लाकडी फळ्यांना सांगाड्याच्या आकाराशी सुसंगत बनवण्यासाठी पारंपारिक वाफेच्या पद्धतीचा वापर केला जाईल. प्राचीन भारतीय जहाजबांधणी पद्धती प्रमाणे.प्रत्येक फळी नंतर दोर/दोरी वापरून दुसर्या फळीला शिवली जाईल, नारळाच्या फायबर, राळ आणि माशाच्या तेलाच्या मिश्रणाने बंद केली जाईल.
जहाज तयार झाल्यानंतर, भारतीय नौदलाकडून प्राचीन दिशादर्शक तंत्राचा वापर करून पारंपारिक सागरी व्यापार मार्गांवरून एक अनोखा प्रवास केला जाईल. मेसर्स होडी इनोव्हेशन्स, गोवा येथे 12 सप्टेंबर 23 रोजी नियोजित बांधणी समारंभाने पुनर्शोध आणि पुनरुज्जीवनाचा प्रवास सुरू होईल. सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या असतील. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार,आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.