नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – खाजगी स्लीपर बसचा चालक समृद्धी महामार्गावर मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याची बुलढाण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस ठाण्यात व्हिडिओ पाहत वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कलम 279, 336 व मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचा नाव धनंजय कुमार सिंह असे असून तो मुंबईचा रहवासी आहे. धनंजय हा संगीतम् ट्रॅव्हल्सची बस नागपूर हुन पुण्याकडे जात होती. मेहकर दरम्यानचा हा व्हिडिओ बोलला जात आहे. या अगोदर देखील छत्रपती संभाजी नगर येथे समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याने बारा जणांचे मृत्यू झाला होता. तर बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 1 जुलैला खासगी बसचा अपघात होऊन 25 जणांचे होरपडून मृत्यू झाले होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहून बुलढाणा उपप्रदेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी तातडीने ही कारवाई केली आहे.