नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – आर्थिक मागास असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींना कमी खर्चात शिक्षण पूर्ण करण्यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. पण खोटे पत्ते, जात प्रमाणपत्र यासारखे कागपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरात RTE कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागपत्र तयार केल्याचे उघडकीस आले.
शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा बनावट कागपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर सिताबर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी बनावट कागपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध सुरू आहे. आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.