Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

विजचोरी प्रकरणी टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करून वीज मीटर काढल्यानंतरही वीजचोरी करणाऱ्या टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा, गोवेली व खडवली परिसरात धडक कारवाई करून ३३ लाख ७८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश आहे.

थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा उपविभागात तपासणी मोहिम राबवण्यात आली. टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत मौर्या नगर, वैष्णवी चाळ, रेणूकानगर चाळ, जयशंकर चाळ, जाधवनगर चाळ, गोवेली रोड, टिटवाळा व बल्याणी परिसरात १६ ग्राहकांकडे ५ लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी आढळली. गोवेली शाखा कार्यालयांतर्गत बेलकर पाडा, आदिवासी वाडी, मुम्हसरुंडी, मामनोली, कुंदे, रायते, भिसोल, नालिंबी, घोटसर, म्हारळ, वरप, नवगाव, कोलम परिसरात ७० ग्राहकांकडे सुरू असलेली १४ लाख २९ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर खडवली शाखा कार्यालयांतर्गत फळेगाव भागात १५ ग्राहकांकडे १४ लाख १० हजार रुपयांची वीजचोरी आढळली.

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येते. टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, निलेश महाजन व कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या टिमने ही कारवाई केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X