नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावती चांदुर रोड ते एस आर पी कँम्प मार्गावरील एकता टेकडीजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने 3 वर्षीय मादी बिबटचा अपघात झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करून अपघाताची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबटला वन विभागाच्या बांबू गार्डन येथे आणून वन अधिकाऱ्यांच्या उपस्थित शवविच्छेदन करून अग्नी देण्यात आली आहे.
अमरावती लगत असलेल्या पोहरा माळखेड जंगल हे वन्यजीवांसाठी अत्यंत संपन्न असे जंगल आहे.वन्यजीवांसाठी एक समृद्ध असा आसरा आहे.रस्ते वाहतूक, त्याच प्रमाणे जंगला मध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी हे जंगला लगतच्या शहरी भागात येत आहेत त्यामुळे अश्या दुर्देवी घटना घडत आहे. अशी माहिती डॉ जयंत वढतकर वनविभाग अधिकारी यांनी दिली आहे.