Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी देश

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला १३ सदस्यीय पत्रकार चमूची भेट

नेशन न्यूज मराठी टीम.

गोवा / प्रतिनिधी – गंगटोक पत्र सूचना कार्यालयाच्या नेतृत्वाखालील 13 सदस्यांच्या पत्रकार चमूने सहायक संचालक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वार्ताहर, संपादक, पत्रकार, स्वतंत्र पत्रकार आणि कॅमेरापर्सन यांचा समावेश असलेल्या चमूने राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला भेट दिली.

संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना एनआयओकडून राबवण्यात येणाऱ्या विविध महासागर विज्ञान संशोधन उपक्रमांची माहिती दिली. संवादात्मक सत्रात हवामान बदल,  सागरी पाण्यात ऑक्सिजन कमी होणे,  पुरातत्व,  सजीव आणि निर्जीव सागरी संसाधने, ईईझेड, मध्य महासागर रिज आणि पाण्याखालील ज्वालामुखी क्रियाकलाप यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संचालकांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांचे महत्त्व आणि त्यात समाविष्ट असलेल्या संशोधनाविषयी स्पष्टीकरण दिले, तसेच त्यांना एनआयओ द्वारे भागधारकांना प्रदान केलेल्या सुविधा आणि सेवांची माहिती दिली. पत्रकार चमूने फलदायी संवादासह संशोधन प्रदर्शनांना भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X