नेशन न्यूज मराठी टीम.
पनवेल / प्रतिनिधी – पनवेलमध्ये अनेक वर्षांपासून एका दुकानात पारंपरिक पद्धतीने वाद्य तयार केले जातात. या दुकानात बनवलेल्या वाद्यांची विक्री हि संपूर्ण महाराष्ट्रात होते, पनवेलमध्ये 1919 पासून येथे दुकान असून चार पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने वाद्य तयार केले जातात.
पुणेकर कुटुंबाच्या 102 वर्षे या दुकानाला झाली असून अद्यापही पारंपरिक पद्धतीने वाद्य तयार करण्याची परंपरा सुरु आहे. वर्षभर वाद्य तयार केले जातात मात्र गणपती सणाला वाद्यांची जास्त मागणी असते. पूर्णपणे हाताने वाद्य बनवले जात असून मशीनने कोणतेही काम केले जात नाही. भजन आणि वारकऱ्यांना लागणाऱ्या वाद्यसाहित्यांची इथं निर्मिती होते. त्याचबरोबर या दुकानात वाद्यांची दुरुस्तीचीही कामे केली जातात.