दौंड/हरीभाऊ बळी – दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन ५ जूनला साजरा केला जातो.वृक्ष काटणी,जंगल तोड,खनिज शोधासाठी खाणी खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर,अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवले आहे. त्यामुळे आपण पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र आले पाहिजे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवार दि.५ जून रोजी दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीतील व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान भुलेश्वर पायथ्यालगत असलेल्या वनविभिगात हरितवारी फाऊंडेशन,ग्रामपंचायत यवत आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.वृक्ष लागवडीची गरज ओळखून हरितवारी फाऊंडेशन,ग्रामपंचायत यवत गावच्या हद्दीतील वनविभिगात वड,पिंपळ, बकुळ, कडूनिंब, मोहगीबी,शिलम,काटेसावर,यासह आदी १५० देशी जातीच्या प्रकाराच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यापूर्वी देखील भुलेश्वर डोंगर परिसरात हरितवारी फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे.यावेळी वनमंडल अधिकारी जी.एम.पवार,वनरक्षक सचिन पुरी, महिला वनक्षेत्रपाल डी.एम.पिसाळ एस.एम.
शिरसाट यवतचे सरपंच समीर दोरगे,उपसरपंच सुभाष यादव,हरितवारी फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन हेंद्रे तसेच हरितवारी फाऊंडेशनचे आदी सदस्य तसेच यवत ग्रामपंचायतीचे आदी सदस्य व आदी वृक्षप्रेमी यावेळी उपस्थित होते.
- June 5, 2021