डोंबिवली प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण परिसरात बैलगाडी शर्यती आयोजन सुरुच करून आयोजकांना महागात पडले आहे कायद्याने बैल शर्यती प्रतिबंध असताना कायदा पायमल्ली व कोरोना महामारीचे नियम धाब्यावर बसवत शेकडो स्पर्धक आणि प्रक्षेक जमा केल्याप्रकरणी आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे मात्र स्थानिक पोलीस यंत्रणा किती गाफील होती हे ही समोर आले आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमामुळे दिसून येते.
कल्याण ग्रामीण भागातील अंतर्ली गावात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यती पाहण्यासाठी शेकडों लोकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँण्टीजेन टेस्ट करणाऱ्या पोलिसाना इतक्या मोठय़ा शर्यतेची माहिती कशी मिळत नाही हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचे वृत्त प्रसारित झाल्याने पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आयोजकावर कोरोना प्रतिबंध कायदा आणि बैल शर्यत प्रतिबंध कायदा अन्वेय डोंबिवली मधील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.