महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image यशोगाथा लोकप्रिय बातम्या

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा

सोलापूर/अशोक कांबळे – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आंबेडकरी विचारवंत,लेखक यांना अमेरिकेतील आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी डॉ.आंबेडकर,सावित्रीमाई फुले आंतरराष्ट्रीय पुरस्काराने डॉ. विजयकुमार त्रिशरण,डॉ. इंदू चौधरी तर मुकनायक पत्रकारिता पुरस्काराने नॅशनल दस्तक, व डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कराने भंते सुरई ससाई यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चेतक ढाकणे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष चेतक ढाकणे म्हणाले की, “डॉ. विजयकुमार त्रिशरण यांना डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२१ या वर्षाचा प्राप्तकर्ता म्हणून निवडण्यात आले आहे. झारखंडच्या ग्रामीण, दुर्गम भागात सुप्रसिद्ध झोला पुस्तकालय (मोबाइल बॅग लायब्ररी) संकल्पनेत डॉ विजय कुमार त्रिशरण यांनी अभूतपूर्व काम केले आहे. तसेच विविध विषयांवर 30 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.सध्या डॉ. विजयकुमार त्रिशरण आंबेडकर चेतना परिषद,बौद्ध मिशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

सावित्रीमाई फुले आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२१ डॉ. इंदू चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ. इंदू चौधरी भारतातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक असून त्या एससी / एसटी कर्मचारी कल्याण संघ, बीएचयू वाराणसीच्या जनरल सेक्रेटरी आहे.त्या मूकनायक या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या मुख्य संपादक देखील आहे.त्यांनी तीन पुस्तके लिहली असून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.त्यांनी अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पेपर वाचन केले आहे.चौधरी यांनी चार विषयातील डॉक्टरी प्रबंध लिहले आहेत. त्यातील एक विषय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनांतील फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव आहे.

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (एएएनए) यांच्या वतीने दिला जाणाऱ्या ‘मुकनायक’ महामहिम पत्रकारिता पुरस्काराची सुरुवात मूकनायक वृत्तपत्राच्या शताब्दी वर्षांपासून म्हणजे २०२० सालपासून करण्यात आली.प्रिंट किंवा डिजिटल मीडियामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्ती / संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.या वर्षीचा मूकनायक महामहिम पत्रकारिता पुरस्कार “राष्ट्रीय दस्तक”/नॅशनल दस्तकला जाहीर करण्यात आला आहे.नॅशनल दस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करत असून दुर्लक्षित, वंचित समाजाचा आवाज आहे.त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.

“डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने भंते सुरई ससाई यांना सन्मानित करण्यात येणार आहे.डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड साल २०२० पासून आंबेडकर असोसिएशन ऑफ उत्तर अमेरिका (एएएनए) च्या वतीने देण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर यांच्या दूरदृष्टीनुसार आजीवन सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या अपवादात्मक कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्ती / संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.अशी माहिती आंबेडकर असोसिएशन ऑफ उत्तर अमेरिका (एएएनए) चे अध्यक्ष चेतक ढाकणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×