नवी दिल्ली/ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोपर्निकस मार्ग स्थित असणाऱ्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायनासह उपस्थितांनी ध्वज वंदन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या कार्यक्रमास सहायक आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांच्यासह मोजके अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Related Posts