मुंबई /प्रतिनिधी – जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे. प्रत्येक जन कोरोनाशी दोन हाथ करण्यात जुंपला आहे. त्यात कोविड योद्धाचे मोठे योगदान आहे. डॉक्टर,नर्स , महानगर पालिका कर्मचारी ,सफाई कर्मचारी, पोलिस त्याचं बरोबर अनेक कोविड योद्धे करोनाशी लढून आपल्याला सुरक्षित ठेवण्यात मदत करीत आहे.
आपल्या घराची, कुटुंबाची काळजी न करता लोकांनसाठी आहोरात्र झटत आहे. त्यात पोलिस कर्मचारी अधिकारीही कसलीही तमा न बाळगता कोरोनाशी दोन हात करीत आहे. आपल्या जीवाची पर्वा न न करता हे कोविड योद्धे आपल्या साठी झटत आहेत .त्यामुळे या योद्ध्यांना साथ देऊन त्यांची काळजी घेणे हि आपली समाज बाधव म्हणून जबाबदारी आहे. या कोविड योद्धाच्या प्रति आपली जबाबदारी ओळखून जनेरिक आधार फार्मा कंपनीचे संस्थापकअर्जुन देशपांडे हि आपल्या परीने जी काही मदत होईल ती करीत आहे.या कोविड योद्धाची काळजी घेणे आपले कर्तव्य समजून जनेरिक आधार ने मुलुंड येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना प्रथमोपचार किट वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे.