महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कलिंगडावर साकारून अनोखी जयंती साजरी

अंबरनाथ/प्रतिनिधी– कोरोनाबाबतचे नियम पाळत अंबरनाथ येथील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांचे कलिंगडावर चित्र साकारून अनोखी जयंती साजरी केली.
अंबरनाथ येथील वैभव भुंडुरे यांनी पिंपळाच्या पानापासून विविध कलाकृती तयार केल्या आहेत. पिंपळाचे पान कोरून त्यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र साकारले आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग अशा अनेक कलाकृती पिंपळाचा पानावर त्यांनी बनवल्या आहेत.
वैभव रघुनाथ भुंडेरे यांनी आतापर्यंत कलिंगड कोरून त्यापासून गैातम बुद्ध, महात्मा फुले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राज ठाकरे, बाळासाहेब ठकरे, सचिन तेंडुलकर,महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, युवराज सिंग अशा अनेक दिग्गजांच्या 40 ते 50 कलाकृती साकारल्या आहेत.
कलिंगडावरील कलाकृतीसाठी अर्धा तास,तर पिंपळाच्या पानावरील कलाकृतीसाठी २० ते ३० मिनिटे लागतात.युट्यूब व फेसबुकवर कलाकृतींचे अनेक फोटो शेअर केल्यानंतर लोक कलेचे कौतुक करून कलिंगडवर स्वतःचे फोटो बनवून घेतात.असे वैभव भुंडेरे यांनी सांगितले.
यावेळी सिध्दार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष मंगेश टपाल,सचिव अभिलाष डावरे,उपाध्यक्ष कांचन कातडे,कोषाध्यक्ष भारत डावरे , मारूती झाडे,गंगाधर वाघमारे व प्रसाद मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×