डोंबिवली प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून निर्बंध आणखी कडक केले आहेत. कल्याण डोंबिवली मध्ये देखील आजपासून या निर्देशांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आज सकाळपासून महापालिकेचे पोलिसांचे पथक विविध दुकानांमध्ये जाऊन तपासणी करत होते .सायंकाळच्या सुमारास डोंबिवली मानपाडा रोड वरील डी मार्ट मध्ये व डी मार्टच्या आवारात शेकडो नागरिकांची गर्दी दिसून आली. महापालिकेला याबाबतची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने तत्काळ या ठिकाणी धाव घेत कोरोना निर्बंधांचं उल्लघन केल्या प्रकरणी डी मार्ट विरोधात कारवाई करत सील ठोकले.30 तारखेपर्यंत डी मार्ट सील असणार आहे.
Related Posts