महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी तंत्रज्ञान

महसुली कर व करेतर रक्कम भरा,आता एका क्लिकवर

    प्रतिनिधी

    मुंबई – महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची सुविधा देणाऱ्या ग्रास महाकोष (gras mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने केली असून या ॲप्लिकेशनचे उद्घाटन वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते नुकतेच झाले.

    हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली असून एनआयसीचे तज्ञ अधिकारी बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा हे ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे.

    महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ‘ग्रास’ ॲपचा वापर करुन शासनाच्या खात्यात रक्कम जमा करू शकतात. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या लेखा व कोषागरे संचालनालयामध्ये ग्रास (GRAS) मोबाईल ॲपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

    नवीन निवृत्ती वेतनधारकांना तातडीने पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना  सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पु‍स्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.

    या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील? याबाबत मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

    यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे,  प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय) श्री. राजीव मित्तल, लेखा व कोषागरे संचालक श्री.ज.र.मेनन, सहसंचालक श्री.जि.रा.इंगळे, उपसंचालक श्री.विनोद शिंगटे, सहायक संचालक श्रीमती प्रगती धनावडे व श्रीमती चित्रलेखा खातू उपस्थित होते.

    लेखा व कोषागरे संचालक श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी  सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

    Related Posts
      Translate »