प्रतिनिधी.
कल्याण – मराठवाडा नामांतर दिनाच्या निमित्ताने कल्याण शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने विविध पक्षातील कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर मराठवाडा नामविस्तार दिना निमित्त नामांतर लढ्यात शहीद झालेल्या आंदोलनकर्त्यां भिम सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. नामांतर लढ्यात ज्या शुरविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या भिम सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या वेळी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कुमार कांबळे, माजी नगरसेवक व जिल्हा महासचिव भीमराव डोळस, रिपब्लिकन पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष संतोष जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे, वंचीत बहुजन आघाडी चे प्रवीण बोडदे, विजय कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दीपक अमृतसागर उपस्थित होते.