प्रतिनिधी.
मुंबई – बदलत्या कामगार कायद्यात कामगाराने चुक केली तर त्याला सजा आणि मालकाने चुक केली तर मात्र त्यांना सरळसरळ माफी देण्यात आली आहे,तेव्हा केंद्र सरकारने नुकताच कामगार कायद्यात केलेला बदल म्हणजे लोकशाहीचा खून आहे,असे सडेतोड विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या सत्कार समयी मांडले आहेत.
महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी रा.मि.म.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते तर खजिनदार निवृत्ती देसाई यांची कार्याध्यक्षपदी नुकतिच नियुक्ती करण्यात आली. त्या बद्दल संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्यकर्त्यांच्या वतीने दोन्हीही नेत्यांचा मनोहर मामा फाळके सभागृहात सत्कार करण्यात आला. त्या वेळी गोविंदराव मोहिते बोलत होते.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
देशाला दिलेल्या घटनेने कष्टकरी कामगार आणि धनिकांना समान न्याय आणि हक्क प्राप्त करुन दिले आहेत.पण विद्यमान केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून लोकशाहीने दिलेल्या कामगाराच्या हक्क-अधिकारावर अंकुश आणला आहे.जे कायदे गं.द.आंबेकर यांच्या सारख्या नेत्यांनी आहोरात्र लढून आणि संघर्ष करून मिळवून दिले तेच मोडीत काढण्यात आले आहेत.कामगार कायद्यातील बदलात परदेशी गुंतवणूकदारा पुढे रेड कारपेट हांतरुण,वर्षोनुवर्षे प्रा.फंड,ग्रँच्युएटी सारख्या सामाजिक हक्का पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना तर या सरकारने गुलाम केले आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर चौफेर टीका करुन,केंद्राने बदलेले कामगार कायदे न स्वीकारण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे,या गोष्टीचे गोविंदराव मोहिते यांनी स्वागत केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी ही राज्यपातळीवर काम करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली, असे नमूद करून गोविंदराव मोहिते म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील एन.टी.सी.गिरण्यां पूर्ववत चालण्याचा लढा कदापि थांबणार नाही,असेही गविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
खजिनदार निवृत्ती देसाई आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले,एन.टी.सी.ने
मुंबईतील गिरण्या विकून ‘टिडीआर’च्या रुपाने मिळविलेले कोट्यवधी रुपये मुंबईतील गिरण्यांच्या विकासावर खर्च करावे आणि येथील रोजगार कायम ठेवावा,ही आमची रास्त मागणी आहे.त्या साठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ लढत राहील, असेही खजिनदार निवृत्ती देसाई आपल्या भाषणात म्हणाले. उपाध्यक्ष रघुनाथ(आण्णा)शिर्सेकर, बजरंग
चव्हाण,कामगार शिक्षण उपप्रमुख मोहन पोळ,राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे संचालक विलास डांगे यांची त्या वेळी भाषणे झाली.व्यासपीठावर सेक्रेटरी शिवाजी काळे,संघटनेचे जनसंपर्क प्रमुख आणि कथालेखक काशिनाथ माटल आदी होते.
