प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पोलीस परिमंडळ -३ मध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यात गुन्हयातील रोकड आणि मुद्देमाल तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली तब्बल ४० लाखाच्या रोकड सह ६५ लाखाचामुद्देमाल कल्याण पोलिसांनी नागरीकांना परत केला.
कल्याणमध्ये चोरी आणि लूटल्या गेलेल्या ६५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रेझिंग डेचे औचित्य साधून नागरीकांना परत केला आहे. कल्याणच्या महात्मा फुले, बाजारपेठ, कोसळेवाडी, खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतीत हरविलेले, चोरीस गेलेले, लूटले गेलेले रिक्षा, बाईक, दागिने आणि रोकड परत केली आहे. विशेष म्हणजे ४० लाखाची रोकडचा समावेश आहे. ज्या एटीएम तोडून चोरटय़ांनी ही रक्कम लंपास केली होती. कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार, चारही पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या हस्ते देण्यात आले. नागरीकांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला रोकड आणि मुद्देमाल रेझिंग डेच्या औचित्य साधून नागरीकांना परत केला आहे. अशीची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी कार्यक्रम प्रसंगी दिली .