प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात कार्यरत असलेले सरोदे हे कर्त्यव्यावर हजर असताना काल मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक एका व्यक्तीने दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आणून दिला. त्यांनतर या मांडूळ सापाची माहिती सर्पमित्र दत्त बोबे यांना सरोदे यांनी संपर्क करून दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे हे अग्निशमन कार्यलयात जाऊन त्यांनी मांडूळ साप ताब्यात घेऊन कल्याण विभागाचे वनपाल एम. डी. जाधव यांच्या कडे नोंद करून ह्या दुर्मिळ मांडूळ जातीचा सापाला जंगला मध्ये सोडण्यात आले
Related Posts