प्रतिनिधी.
सोलापूर – आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या शेळीला जन्मलेल्या माथ्यावर मधोमध एक डोळा असलेल्या पाडसाचा अखेर 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सहा वाजता उलट्या होवून मृत्यू झाला असल्याची माहिती श्रवण बाबूराव पवार यांचे मावस भाऊ रमेश कांबळे यांनी दिली.
आष्टी येथील पवार यांच्या शेळीने दि.19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजता एक पाठ जातीच्या व एक बोकड जातीच्या पिल्लाना जन्म दिला होता.त्यातील एका बोकड जातीच्या पिल्लाला जन्माताच माथ्यावर मधोमध एक डोळा असल्याने जिल्ह्यात कुतुहलाचा विषय झाला होता.आष्टी येथील परिसरात विविध चर्चाना उधान आले होते.माथ्यावर एक डोळा असलेल्या बोकडाला पहाण्यासाठी जिल्ह्यातून अनेक लोक भेट देवू लागले होते.दि.20 डिसेंबर रोजी दिवसभर बोकड ठणठणीत होते असे बोकडाचे सांभाळ करणारे कुटुंबाने सांगितले.पंरतु दि. 20 डिसेंबर च्या रात्री बोकडाची तब्येत अचानक बिघडल्याने माळरानावर रहात असल्याने रात्रीच्या वेळी डॉक्टरांना बोलावता आले नाही. परंतु दि.21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सहा वाजता बोकडाला उलट्या झाल्याने त्याने जीव सोडला.एक डोळा असलेले बोकड मृत्यू पावले असे शेळ्यांचे पालन पोषण करणार्या पवार कुटुंबाने सांगितले.