प्रतिनिधी.
मुंबई– राज्यात डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवी औद्योगिक गुंतवणूक येत आहे, तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि कोस्टल हायवेसारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन 2030 पर्यंतचा वीज पारेषण आराखडा तयार करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
ऊर्जा विभागाअंतर्गत राज्य प्रेषण केंद्र (स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी) ची बैठक घेऊन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एस टी यू कडे प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते.
राज्य पातळीवर वीज यंत्रणेच्या जाळ्याचे नियोजन अधिक शास्त्रीयदृष्ट्या करण्याचे काम एसटीयूला यापुढे करावे लागणार आहे. सध्याच्या यंत्रणेतील त्रुटी दूर करून लघुकालीन व दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. 2030 पर्यंतची विजेची गरज आणि ती पुरविण्यासाठी पारेषण यंत्रणा कशी लागणार आहे, यासाठी एक आराखडा तयार करावा. अत्याधुनिक अशी स्काडा यंत्रणा उभारा, असे आदेशही डॉ.राऊत यांनी दिले.
खासगी वीज कंपन्याकडून पारेषण यंत्रणा उभारण्यासाठी कोणते प्रस्ताव आले आहेत आणि ते प्रलंबित असल्यास त्या मागील कारणे काय, याबद्दल उर्जामंत्र्यांनी बैठकीत विचारणा केली. खासगी कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावांची व्यवहार्यता आणि गरज तपासून हे प्रस्ताव गतीने वीज नियामक आयोगाकडे सादर करायला हवेत. एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको इत्यादी संस्थासोबत बैठक घेऊन विजेची मागणी व आपल्या तयारीचा मेळ घालायला हवा, अशा सूचनाही डॉ.राऊत यांनी दिल्या.
तांत्रिक सल्ला घ्या
विजेची वाढती मागणी पाहता भविष्यात 12 ऑक्टोबरसारखी घटना घडू नये यासाठी आयलँडिंग यंत्रणा यशस्वीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याची सूचना त्यांनी केली.
सर्व ट्रान्समिशन कंपन्यांनी प्रस्तावित केलेल्या योजना जर त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर मुंबईच्या भविष्यातील मागणी पुरवठ्यावर काय परिणाम होईल याचे एसटीयुने मुद्देसूद सादरीकरण करावे.
ग्रीड कोऑर्डीनेशन कमिटीला यापुढे आपल्या कार्यशैलीत आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून त्यासाठी वेगवेगळ्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी केल्या. यावेळी एस. टी. यु. कडून सादरीकरण करण्यात आले.
Related Posts
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारणी मीटिंग…
-
उल्हासनगर मध्ये वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
दंगली घडविणाऱ्या राजकरणात इंडियाची गरज आहे - राजू वाघमारे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या भारतातील सर्वच राजकीय…
-
भिवंडीत वाढीव वीज बिला विरोधात मनसे आक्रमक, फोडली टोरंट पावरची कार्यालये
प्रतिनिधी. भिवंडी - वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी दोन दिवसात होणार बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महानिर्मिती महावितरण…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
अवकाळी पावसाने आसनगाव परिसरात वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर /प्रतिनिधी - गुरुवारी ०१ जून…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव
नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईची धग जनतेला बसत…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
युआयडीएआय घेऊन आले “रीइमॅजिन आधार” संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागरिकांना आधार ओळख…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये…
-
वीज दरवाढी विरोधात तेजश्री कार्यालयावर आपचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरण कडून लॉकडाऊन…
-
कल्याणात बंदूक घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या नवीन दिवसाबरोबर…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
- मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. ३० - महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील तलाव आणि धरणांमध्ये…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी…