प्रतिनिधी.
मुंबई – कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलाने खूप महत्वाची कामगिरी बजावली आहे. पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. महिला पोलिसांनी हि करोना काळात खूप मोठी जबाबदारी मोठ्या हिम्मतिने संभाळली आहे.
शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार संध्या शीलवंत यांनी एकाच दिवशी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे उत्तरदायित्व पार पाडले. या काळात त्यांनी एकूण सहा अंत्यसंस्कार केले. त्यांच्या रूपाने वर्दीतील स्त्रीशक्तीचे दर्शन घडले आहे. त्यांच्या कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा फार कौतुक केले आहे. या पोलीस कर्मचारी महिलेने आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आशा वर्दीतील स्त्रीशक्तीला नेशन न्युज मराठी टीम कडून मानाचा सलाम