प्रतिनिधी.
उल्हासनगर – कल्याण उल्हासनगर मधील प्रसिद्ध कंपनी बिर्ला ग्रुपची सेंच्युरी रेयॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सकाळी कंपनी च्या ऑफिस मधून बाहेर कामानिमित्त निघत असताना आपल्याला राहण्यासाठी कॉटर मिळत नाही याचा राग मनात ठेवून कामगाराने प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्लेखोर कामगाराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, नक्की कुठल्या कारणा मुळे कामगार इतका उग्र झाला त्याचा तपास सुरू आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे.
शहाड बिर्ला गेट जवळ सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कंपनी बाहेर हा हल्ला करण्यात आला. ओ.आर. चितलांगे यांच्या शरीरावर चाकुचे तीन वार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११:३० कंपनीचा कामगार अरुण मसंद (४५) याने चर्चा केली की मला राहण्यासाठी कोर्टर मिळत नाही हे बोलणे झाले त्यानंतर अरुण याने खिशातून चाकू काढत तीन वार केले त्यानंतर गेट जवळील सुरक्षा रक्षक आणि स्टाफ मधील कामगारांनी हल्लेखोराला पकडून उल्हासनगर कॅम्प -१ मधील पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू केली आहे दरम्यान कंपनी च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला नक्की कोणते कारण असावे त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पंचकुशीत ही कंपनी खूपच प्रसिद्ध आहे त्यामुळे घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे .