नाशिक/प्रतिनिधी – डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. एमआयडीसीतील अमुदान कंपनीची मालकीण मालती मेहताला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रांच युनिट व ठाणे क्राइम ब्रांच युनिट काल रात्रीपासून मालती मेहता यांच्या मागावर होते. आज अखेर मालती मेहताला पकडण्यात यश आले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मालतीवर दाखल करण्यात आला आहे.
कंपनीत स्पोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता सायंकाळी नाशिकमध्ये आल्या. नाशिकमध्ये दाखल होत नातेवाईकांचा मालती मेहता यांनी आश्रय घेतला होता. पण पोलिसांनी तांत्रिक विषलेशांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी मालती मेहताला जेरबंद केल्याची महिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
कंपनीत लागलेल्या भीषण आगीत फक्त लोकांचा मृत्यूच झाला नाही तर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. मृतांचा आकडा 13 वर पाेहचला तर जखमींची संख्या एकूण ६५ झाली आहे. कंपनीच्या चुकीचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम हा निष्पाप लोकांना आणि कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भोगावा लागला. या संपूर्ण घटनेमुळी डोंबिवली शहर हादरले आहे. जळून गेलेल्या कंपन्या आणि दुकानांची राख, इमारतीच्या फुटलेल्या काचा आणि जमिनीला बसलेले हादरे या सगळ्याच गोष्टी डोंबिवली करांसाठी एका वाईट स्वप्नासारखेच होते.