नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – वाऱ्याच्या दिशेप्रमाने महाराष्ट्राच्या राजकारणाला ही कधी कोणती दिशा मिळेल सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅग प्रकरणाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिक मध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून बाहेर येताच त्यांच्या बॅगांची पोलिसांनी झडती घेतली. निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाच्या सुचनेवरून ही कारवाई करण्यात आली.
बॅग प्रकरणावरून आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले “नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅग चेक करण्याचं नाटक ठरवून केलेलं आहे. ती बॅग उचलणारे कोण आणि तपासणारे कोण हे सगळं ठरलेलं होतं. दोन तासाच्या प्रवासात 19 बॅगा लागतात? आणि 19 बॅगांमधून फक्त दोनच बॅगा चेक केल्या जातात. त्या बॅगा कुठे गेल्या? कोणत्या हॉटेलला पोहोचल्या? त्यांच्याच लोकांनी बॅगा तपासल्या आणि सोशल मीडियावर त्या व्हायरल केल्या. या सर्व गोष्टी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे.”