नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धान पिकांची कापणी सुरू झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये सध्या धान पीक कापणी करीत असल्याचे चित्र आहे. मात्र अशातच गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या हाहाकाराचा घातक परिणाम पिकांवर तसेच हवामानावर होतो आहे. शेतकऱ्याने उन्हा तान्हात घाम गाळून वाढवलेलं सोन्यासारखं पीक आता जमीनदोस्त होईल अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
गोंदियातील ताराम फुंडे या शेतकऱ्याने धान कापून आपल्या शेतात वाळवण्यासाठी ठेवले आहे. पण जर पावसाने हजेरी लावली तर याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे आता धान पिकाला कोणतेही नुकसान नाही झाले पाहिजे. अशी शेतकरी अपेक्षा करत आहेत. तसेच झालेल्या नुकसानाची सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.