महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणात इमारतील घराला भीषण आग, आगीत सिलेंडरचाही स्फोट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग आगीत घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

येथील रामदासवाडी परिसरात मैत्रेय नावाची दोन मजली इमारत असून त्यामधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये ही आग लागली. सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्याच्यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. तसेच घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

दरम्यान केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. आणि परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला.

Translate »
×