महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी देश

भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) 05 मे 2024 रोजी केरळच्या किनाऱ्याजवळ, बेपोरच्या पश्चिमेला असलेल्या समुद्री भागातून सहा भारतीय कर्मचाऱ्यांसह एक इराणी मासेमारी बोट ताब्यात घेतली. आयसीजीच्या बोटी आणि विमाने यांच्या वेगवान समुद्री-हवाई समन्वयासह ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

इराणी बोटीला अडवल्यानंतर, आयसीजीच्या जवानांच्या तुकडीने बोटीवर प्रवेश केला आणि देशविरोधी कारवायांमधील सहभागाचा शोध घेण्याच्या दृष्टीने या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती असे दिसून आले की या बोटीचा मालक इराणी नागरिक असून त्याने तामिळनाडूमधील मासेमारांना कंत्राटी स्वरूपाच्या व्यवहारातून बोटीवर काम दिले आणि त्यांना इराण जवळील समुद्रात मासेमारी करण्यासाठी इराणी व्हिसा मिळवून दिले.

त्या बोटीवरील भारतीय कामगारांनी असा आरोप केला आहे की बोटीच्या मालकाने त्यांना वाईट वागणूक दिली आणि मुलभूत जीवनावश्यक बाबींपासून त्यांना वंचित ठेवले तसेच त्यांचे पासपोर्ट देखील आपल्या ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेली बोट अधिक तपासासाठी 6 मे 2024 रोजी कोची येथे सुरक्षितपणे आणण्यात आली.

Translate »
×