महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

पत्रिपुलाच्या कामासाठी २१ आणि २२ नोव्हेंबरला मेगाब्लॉक,अतिरिक्त बसेसची व्यवस्था

प्रतिनिधी.

ठाणे – शीळ पत्रिपुल गर्डर लौंचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी कल्याण ते डोंबिंवली स्थानका दरम्यान रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कल्याण ते डोंबिवली येथील प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होणार नाही यापद्धतीने दोन स्थानकांपासुन अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, सह संचालक चंद्रकांत पुलकुंडवार वाहतुक उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासहित संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 

ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकांच्या परिवहन विभागाकडून आणि एस.टी. महामंडळकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याण – शीळ पत्रिपूलाचे येत्या 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी गर्डर लौंचिंग करण्यात येणार असून अंतिम टप्प्यात आलेले हे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जाणार आहे. यानंतर तात्काळ कल्याण – शीळ पत्रिपुल डिसेंबर अखेर वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ – कल्याण – भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या लाँचिग प्रक्रियेकरिता 21 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी दोन दिवस प्रत्येकी 4 तासांचा मेगाब्लॉक मिळावा यासाठी मागील आठवड्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाठवपुरावा केला होता. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी 4 तास असा एकूण 8 तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी 3 तास असा 6 तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 

मुंबई ते डोंबिवली तसेच कल्याण ते कर्जत कसारा या मार्गावर रेल्वेसेवा पुर्ववत सुरु राहणार आहे.केवळ कल्याण ते डोंबिवली या स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.परंतु या कामा दरम्यान 250 लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचे आज झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. 

सदर समस्या सोडवण्याकरिता करावयाच्या पर्यायी वाहतूक उपाययोजना , त्याचबरोबर गर्डर लौंचिंगचे काम सुरक्षितपणे करण्यासाठी संबंधितांना सुचना करण्यात आल्या. कल्याण ते डोंबिवली तसेच डोंबिवली ते कल्याण या मार्गावर नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे – नवी मुंबई आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त एस.टी. बसेस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने तात्पुरती स्वरूपात खाजगी वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाच्या दरम्यान सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध ठेवण्याची सूचना डॉ शिंदे यांनी केली. या दोन दिवशी १० ते २ या वेळात मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेलातरच घराबाहेर पडावे. तसेच कल्याण व विठ्ठलवाडी बस डेपो येथुन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या बससेवेचा लाभ घ्यावा तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खा. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

Related Posts
Translate »