नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – उन्हाळा सुरु झाला की आंबा, कलिंगड आणि टरबूज या फळांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. जास्त पैसे देऊन लोकं या फळांना विकत घेतात. कारण कलिंगड आणि टरबूज या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात अशा प्रकारची फळे खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात.
सध्या टरबूजचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे विविध भागातून टरबूज विक्रीसाठी एपीएमसी बाजारात दाखल होत आहेत. कानपुरी टरबूज देखील विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. या कानपुरी टरबूजला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून टरबूज एपीएमसी बाजारात येत आहेत. सध्या आवक वाढली असल्याने दर सुद्धा स्थिर आहे. 30 ते 40 रुपये किलोने टरबूज विकले जात आहेत. तीन महिने टरबूजचा हंगाम असतो. पावसाळ्यापर्यंत टरबूजचा हंगाम संपेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.