नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. उन्हाच्या कडाक्यापासून गारवा जरी मिळाला असला तरी शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे मात्र गरीब शेतकऱ्याला फटका बसत आहे. हा अवकाळी पाऊस आपल्याबरोबर वादळ आणि वारं घेऊन येत आहे. त्यामुळे शेतातील पिकं, झाडं कोसळून पडत आहेत. मागच्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत.
उत्तर सोलापूरमधील मार्डी तालुक्यातील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याची 500 केशर आंब्यांची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. केशर आंब्यांची लागवड करायला ३-४ वर्षांचा काळ गेला. पण आता जेव्हा केशर आंबा काढणीला आला, तेव्हाच पावसाने गोंधळ घातला. या पावसाने पाटील यांचे लाखों रुपयांचे नुकसान केले आहे. असे शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी सांगितला. त्यामुळे ज्या पिकांची,फळबागांची नासधूस झाली आहे. त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.