नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी रात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने एका रात्रीत शेतकाऱ्यांना देशोधडीला लावले आहे. अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने पिकवलेले पीक जोरदार पावसात व्हावून गेले . हतबल शेतकरी काहीच करू शकले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे कापूस, तीळ, मका आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता, त्यातच मंगळवारी रात्री विजांच्या जोरदार कडकडाटासह हा मुसळधार पाऊस पडला.
सुदैवाने या अवकाळी पावसाने कुठेही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांची प्रचंड दाणादाण उडाली. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारण शेती हीच शेतकऱ्यांच्या उपजीवेकेचे एकमेव साधन आहे.
आत्महत्येनंतर शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जर पिकांचे नुकसान झाल्यावर तातडीने मिळाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. याची दखल सरकार ने घ्यायला हवी.