अहमदनगर/प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आज जामखेड तालुक्यातील खर्डा व परिसरात पोहोचली होती. यावेळी गावागावातील ग्रामस्थांनी त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके म्हणाले की माझे निवडणुक जनतेने हातात घेतली असून ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली आहे. यात्रेला दिवसेंदिवस लोकांचा सहभाग वाढत आहे. ज्यावेळी सर्वसामान्य जनता एकवटते त्यावेळी धनशक्ती सुद्धा उपयोगी पडत नाही. आम्ही गावात पहाटे तीन वाजता पोहचलो तरी लोक ही मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यामुळे स्वाभिमान जनसंवाद यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
यावेळी त्यांनी कथित ऑडिओ क्लिप बाबतही भाष्य करताना लंके म्हणाले दोषी असतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे. पण दहशत करणारे कोण आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.