नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते.अन्न,वस्त्र,निवारा याप्रमाणेच लोकसभा निवडणूक ही फार महत्वाची आहे. कारण निवडनुकीच्या या प्रक्रियेमुळेच समाज सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडत असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य जनतेला आपला आवडता उमेदवार निवडून देण्याचा अधिकार असतो. सर्वसामान्यांची मदत करणारा त्यांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणाऱ्या उमेदवारला निवडून देणे हे मोठे दाइत्वच आहे, आणि याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असायलाच हवी.
आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पिढीलप्रमाणे आहे यात बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बुलढाणा ,अकोला, अमरावती, वर्धा , यवतमाळ-वाशिम, हिंगोली ,नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत एकूण 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल झाले होते. पण एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.