नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
भंडारा/प्रतिनिधी – भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रफुल पटेलांच्या बालेकिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडुंचे कौतुक केले तसेच त्यांची भूमिका चांगली आहे,त्यांनी आपली ही भूमिका निरंतर चांगल्या प्रकारे ठेवावी असे रोहित पवार म्हणाले. ज्याप्रमाणे ते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच प्रयत्न आम्ही सुद्धा अमरावती मध्ये करू आणि निश्चितपणे अमरावतीमध्ये भाजपा प्रणित उमेदवार निवडून येणार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांनी बच्चू कडुंचे कौतुक केले पण त्याबरोबरच प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की ‘भाजपासोबत गेल्यानंतर प्रफुल पटेल यांना अहंकार आला आहे. सीबीआय ची साडेआठशे कोटीची केस बंद झाल्याने आनंद व्यक्त करत असतील गोंदिया भंडारा जिल्ह्याची जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणतील.