नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या रंधूमाळीत आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात देशभर सुरू आहे. त्यातच प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना ठाकरे गट (Priyanka Chaturvedi) यांनी विरोधकांवर आरोप करत त्यांचा समाचार घेतला आहे. नाशिक आणि ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले असूनही या जागांवर भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटात चुरस चालू आहे. बंद दाराआड सुरू असलेली मारामारी महाराष्ट्र पाहत आहे. ना नाशिकबाबत निर्णय, ना कल्याणचा निर्णय, ना ठाणे येथेही निर्णय मुख्यमंत्री आपल्या मुलाचे तिकीट आणू शकत नाही, तर सोबत गेलेल्या खासदारांना काय आश्वासन देणार. असा टोलाही प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
भाजप फक्त वापरा आणि फेकण्याचे काम करते. सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुका येऊ द्या, मग भाजप यांची अशी अवस्था करेल की, अख्खा महाराष्ट्र त्यांची नालस्ती करेल, अशी टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.महाराष्ट्राची जनता ही काहीही सहन करेल पण बेईमानी आणि गद्दारी सहन करणार नाही. जर कोणी लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहे, ते म्हणजे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले आहे. येणाऱ्या काळात जनता आम्हाला मोठ्या बहुमताने आम्हाला विजयी करून ते जनता दाखवून देईल.